आदित्य धर दिग्दर्शित बहुचर्चित स्पाय थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत असलेला हा सिनेमा थिएटरमध्ये सुपरहिट ठरल्यानंतर आता घरबसल्या पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. अशातच, सिनेमाच्या ओटीटी रिलीजबाबत एक संभाव्य अपडेट समोर आले आहे.
थिएटरनंतर आता ओटीटीकडे वाटचाल
‘धुरंधर’ने रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत अनेक विक्रम मोडले. अॅक्शन, देशभक्ती आणि थरारक कथानकामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिकांबरोबरच सिनेमातील ट्विस्ट्स आणि वेगवान मांडणीची विशेष चर्चा झाली.
आता, ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही किंवा ज्यांना तो पुन्हा एकदा पाहायचा आहे, त्यांच्यासाठी ओटीटी रिलीज ही मोठी संधी ठरणार आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार ‘धुरंधर’?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘धुरंधर’ थिएटरनंतर Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ओटीटी प्लेवर उपलब्ध माहितीनुसार, सिनेमाचे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सकडे असू शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
संभाव्य OTT रिलीज तारीख काय?

सध्या चर्चेत असलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर’ 30 जानेवारी 2026 रोजी ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, ही तारीख संभाव्य असून सिनेमाचे निर्माते, कलाकार किंवा नेटफ्लिक्सकडून याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी अंतिम घोषणेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्टारकास्ट आणि पुढील भागाची उत्सुकता
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत या चित्रपटात
आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन, गौरव गेरा, दानिश पांडोर यांसारखे दिग्गज कलाकार झळकले आहेत.
याशिवाय, ‘धुरंधर पार्ट 2’ संदर्भातही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
बॉक्स ऑफिसवर अजूनही दमदार कामगिरी
‘धुरंधर’ 5 डिसेंबर 2025 रोजी रिलीज झाला होता. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 24 दिवसांत या चित्रपटाने 690.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
24 व्या दिवशी 22.5 कोटींची कमाई झाली होती, तर 25 व्या दिवशीही चित्रपटाने कोट्यवधींचा टप्पा ओलांडला.
2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून ‘धुरंधर’कडे पाहिले जात आहे.

