साकोली | प्रतिनिधी
साकोली नगरपंचायतच्या 2025 मधील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, शहरातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. आठही प्रभागांमधील निकालांमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवारांना यश मिळाले आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे पुष्कर करंजकर आणि काँग्रेसच्या वैशाली लांजेवार यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक २ मधून भाजपचे राजकुमार पोगडे आणि काँग्रेसच्या त्रिवेणी चौधरी विजयी ठरल्या. प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेसचे कुणाल राऊत तर अपक्ष रोहिणी मुंगुलमारे यांनी बाजी मारली.
भाजपने प्रभाग क्रमांक ४ मध्ये पंकज मुंगुलमारे आणि प्रीती डोंगरवार यांच्या माध्यमातून दुहेरी यश मिळवले. प्रभाग क्रमांक ५ मध्ये काँग्रेसचे संदीप बावनकुडे आणि भाजपच्या मेघा बडवाईक विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे प्रमोद गजभिये आणि काँग्रेसच्या साईली दोनोडे यांनी विजय संपादन केला.
तसेच प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपचे किशोर पोगडे आणि सौ. रेणू गणवीर विजयी ठरले. प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नयन पटेल आणि काँग्रेसच्या निर्मला नंदेश्वर यांनी यश मिळवले.
या निकालांमुळे साकोली नगरपंचायतमध्ये कोणत्याही एका पक्षाचे स्पष्ट बहुमत नसल्याचे चित्र दिसून येत असून, आगामी नगराध्यक्ष पदासाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने नवनिर्वाचित सदस्यांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

