लाखनी शहरात अवैधरीत्या साठवण्यात आलेला सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी कारवाई करत जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 44 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
लाखनी येथील लाखनी पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांना अर्बन बँकेच्या मागील परिसरात एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू साठवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान आरोपीच्या घरातील स्वयंपाक खोलीत मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तपासणीनंतर पोलिसांनी अंदाजे 44 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला.
या प्रकरणी जहिद आझाद हुसेन सय्यद याला पोलिसांनी अटक केली असून, अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत मानक कायदा 2026 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाखनी पोलीस करत आहेत.
अवैध सुगंधित तंबाखूच्या विक्री व साठ्यावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

