साकोली | प्रतिनिधी
साकोली येथील फ्युचर पोदार लर्न स्कूलने ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे आयोजित इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान व विज्ञान या विषयांच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेच्या यशात भर घातली आहे.
अव्वल कामगिरी करणारे विद्यार्थी
या परीक्षेत युगांश बिसेन याने ९५.१३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे रोश कापगते (९४.८३%), दक्ष जोशी (९३.४६%), अक्ष गुमा (९३.३३%), अभिषेक कानेकर (९२.८५%), श्रवण बोऱकर (९२.६८%), काव्या देशमुख (९२.५७%), जान्हवी येलेकर (९१.८८%), दिशा मरके (९१.४८%), सार्थक कापगते (९१.३९%), कार्तिक गहाणे (९१.३३%), श्रेयांश देशमुख (९१.११%), विधान विठुले (९०.९६%), भागवी इलके (८९.६१%), रियांश लांजेवार (८९.४२%), विधी अग्रवाल (८९.२१%) आणि स्वराज चव्हाण (८८.९१%) यांनी घवघवीत यश संपादन केले.
योग्य मार्गदर्शन आणि सातत्याचा परिणाम
शाळेमध्ये नियमित सराव, संकल्पनाधारित अध्यापन, वैयक्तिक मार्गदर्शन आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना हे यश मिळाले. स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा, या दृष्टीने शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शाळा प्रशासनाकडून अभिनंदन
या यशाबद्दल शाळा संचालिका नमिता अजयर तुमसेरे, प्राचार्य, तसेच शिक्षकवृंदाने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आगामी काळातही अशाच प्रकारे गुणवत्तापूर्ण निकाल देण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

