भंडारा | प्रतिनिधी
भंडारा नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना गटाचे नगराध्यक्ष मधुकर (मदनकर) मदनकर यांना पक्षातील गटनेते व पदाधिकाऱ्यांकडून बिनशर्त समर्थन जाहीर करण्यात आले आहे. नगर परिषदेत स्थैर्य राखून शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी हे समर्थन देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेना गटनेते राजेश रामचंद्र धुर्वे यांनी नगराध्यक्षांना उद्देशून पाठविलेल्या पत्रात, भंडारा शहरातील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, रस्ते, सार्वजनिक सुविधा तसेच विविध विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी सक्षम व स्थिर नेतृत्व आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. नगराध्यक्ष मधुकर मदनकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेत विकासाभिमुख धोरण राबवले जात असून, आगामी काळातही सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे DocScanner 13 Jan 2026 6-18 pm ….
पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत शहराच्या हितासाठी पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून नगराध्यक्षांना संपूर्ण पाठिंबा देणे आवश्यक आहे. नगर परिषदेतील सर्व विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि शहराचा सर्वांगीण विकास यासाठी शिवसेना गट नगराध्यक्षांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
या बिनशर्त समर्थनामुळे भंडारा नगर परिषद मधील सत्तास्थैर्य अधिक बळकट झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

