आसाममध्ये सुखोई-30 फायटर जेट अपघात; नागपूरचा फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरुगकर शहीद

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
1 View
1 Min Read
आसाममधील सुखोई-३० एमकेआय फायटर जेट अपघातात भारतीय वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर अनुज आणि नागपूरचे फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरुगकर शहीद.

नागपूर / आसाम :
आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे सुखोई-३० एमकेआय फायटर जेट कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात भारतीय वायुसेनेचे दोन धाडसी वैमानिक शहीद झाले असून त्यामध्ये स्क्वाड्रन लीडर अनुज आणि नागपूरचे फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरुगकर यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण विदर्भात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (५ मार्च २०२६) भारतीय वायुसेनेचे सुखोई-३० एमकेआय फायटर जेट नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होते. आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील डोंगराळ व घनदाट जंगलाच्या परिसरातून उड्डाण करत असताना अचानक विमानाचा ग्राउंड कंट्रोलशी संपर्क तुटला आणि काही क्षणातच विमान रडारवरून गायब झाले.

विमानाशी संपर्क तुटल्यानंतर तात्काळ शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. दीर्घ शोधमोहीमेनंतर अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले. मात्र या भीषण दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली.

या दुर्घटनेत शहीद झालेले फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरुगकर हे नागपूर जिल्ह्याचे रहिवासी होते. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील डीएसए अकादमीत शिक्षण घेतले होते. त्यांच्या वीरमरणाची बातमी समजताच नागपूर व भंडारा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

दरम्यान, भारतीय वायुसेनेकडून या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असून देशसेवेत असताना वीरमरण आलेल्या दोन्ही वैमानिकांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *