आरोग्य सेवा नागपूर मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेत भंडारा संघाचा थरारक विजय…

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
2 Min Read
नागपूर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा संघाने शानदार विजय मिळवला.

नागपूर | प्रतिनिधी

उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ, नागपूर यांच्या वतीने पहिले भव्य टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट दिनांक २२ व २३ जानेवारी रोजी रेल्वे अजनी मैदान, नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेतील अंतिम सामना जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडाराडागा रुग्णालय, नागपूर या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगला. हा सामना ७ षटकांचा खेळविण्यात आला. अंतिम सामन्यात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा संघाचे कर्णधार लोकेश शिंदे यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व डागा रुग्णालय नागपूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

प्रथम फलंदाजी करताना डागा रुग्णालय नागपूर संघाने ठराविक ७ षटकांत ६२ धावा केल्या व भंडारा संघासमोर विजयासाठी ६३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा संघाने संयमी व आक्रमक खेळाचे दर्शन घडवत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रोखून धरला.

नागपूर येथील रेल्वे अजनी मैदानावर झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा संघाने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत विजय मिळवला.

अंतिम षटकातील शेवटच्या चेंडूवर ६ धावांची आवश्यकता असताना, फलंदाज सचिन मते यांनी दबावाखाली शानदार षटकार ठोकत संघाला थरारक विजय मिळवून दिला. त्यांच्या या खेळीमुळे मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करत विजयी संघाचे अभिनंदन केले.

या सामन्यात कर्णधार लोकेश शिंदे यांनी गोलंदाजीमध्येही उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांनी एका षटकात केवळ ६ धावा देत तब्बल ३ खेळाडूंना बाद केले. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना अंतिम सामन्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

या भव्य क्रिकेट स्पर्धेमुळे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात क्रीडा भावना, संघभावना व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमांमुळे कामाच्या तणावातून मुक्ती मिळत असल्याची भावना अनेक सहभागी खेळाडूंनी व्यक्त केली.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *