पवनी फिल्पकार्ट कार्यालयात धाडसी चोरी; ३.९१ लाखांची रोकड लंपास

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
1 View
2 Min Read
पवनीत धाडसी चोरी! फिल्पकार्ट कार्यालयाचे शटर तोडून ३.९१ लाखांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू.

भंडारा | प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातील शेगावनगर परिसरात असलेल्या फिल्पकार्ट (Flipkart) कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत तब्बल ३ लाख ९० हजार ९५६ रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पवनी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी वॉर्ड, पवनी येथील रहिवासी अंकित मनोहर भोंगळे (वय ३०) हे शेगावनगर येथील फिल्पकार्ट कार्यालयात टीम लीडर म्हणून कार्यरत आहेत. पार्सल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून जमा झालेली रोकड कार्यालयातील कॅश लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती. या लॉकरमध्ये एकूण ३,९०,९५६ रुपये ठेवण्यात आले होते.

मंगळवारी (२८ जून) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या शटरवरील दोन्ही कुलपे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील भिंतीला जोडलेला कॅश लॉकर उखडून त्यामधील संपूर्ण रोकड घेऊन आरोपी फरार झाले.

बुधवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच अंकित भोंगळे यांनी तत्काळ पवनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चोरीपूर्वी आरोपींनी कार्यालयाची रेकी केली होती का, तसेच या गुन्ह्यात स्थानिक अथवा अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पवनी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


पवनीतील फिल्पकार्ट कार्यालयात ३.९१ लाखांची धाडसी चोरी; शटर तोडून रोकड लंपास.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Pages