साकोलीत एनसीबीची मोठी कारवाई; 245 किलो गांजा जप्त, 2.5 कोटींचा मुद्देमाल हस्तगत

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
2 Views
2 Min Read
साकोलीत एनसीबीची धडक कारवाई! 🚨 245 किलो गांजा जप्त, 2.5 कोटींचा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी अटकेत.

साकोली | प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील साकोली परिसरात अमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई विभागीय पथक आणि साकोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 245 किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा ओडिशाहून नागपूरकडे तस्करीसाठी नेला जात असल्याची माहिती तपासात समोर आली असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एनसीबी मुंबईचे अतिरिक्त संचालक अमित घावट यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच एनसीबीच्या पथकाने साकोली परिसरात सापळा रचून संशयित वाहन अडविले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेटमध्ये लपवून ठेवलेला गांजा आढळून आला.

त्यानंतर वाहनासह जप्त मुद्देमाल साकोली पोलीस ठाण्यात आणण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अवैध बाजारातील अंदाजे किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन आरोपी ताब्यात

या कारवाईत कामेश बिरनसिंग बघेल (वय 42, रा. नागपूर) आणि प्रशांत धुर्वे (वय 23, रा. वरूड, जि. अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशाहून नागपूरमध्ये पुरवठ्यासाठी नेला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोठ्या तस्करी रॅकेटचा तपास सुरू

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई अमली पदार्थ तस्करीविरोधातील मोठे यश मानली जात असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अमली पदार्थ बाजारात पोहोचण्यापासून रोखण्यात यश आले आहे. तसेच अनेक युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यापासून वाचविण्यास मदत होणार आहे.

सध्या एनसीबीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या धडक कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, पोलीस निरीक्षक एस. पी. आचरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत तसेच एनसीबी आणि साकोली पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Pages