अभिनेत्री रिंकू राजगुरु भंडाऱ्याच्या बेला येथे 2 फेब्रुवारीला भेट देणार..

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
26 Views
1 Min Read
मराठी चित्रपट सैराट मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु

भंडारा | ब्युरो

मराठी चित्रपट सैराट मधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरु आगामी 2 फेब्रुवारी 2026 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत तिचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यादरम्यान रिंकू राजगुरु भंडारा तालुक्यातील बेला ग्रामपंचायतीला भेट देणार असून, ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचार व जनजागृती कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू राजगुरु 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भंडारा येथे दाखल होणार असून, रात्रीचा मुक्काम भंडारामध्येच करणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.40 वाजता ती बेला ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून अभियानासंदर्भातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेणार आहे.

या कार्यक्रमात राज्यस्तरीय पथकही उपस्थित राहणार असून, स्थानिक नागरिकांना पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व, शासकीय योजना आणि ग्रामविकासासंदर्भातील माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रमानंतर रिंकू राजगुरु राज्यस्तरीय पथकासोबत पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकप्रिय अभिनेत्रीच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले असून, बेला परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *