सहा वर्षांनंतर सहा सभापतींची बिनविरोध निवड; कान्हान–पिपरी नगरपरिषदेत राजकीय स्थैर्य

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
2 Min Read

कान्हान | प्रतिनिधी : कान्हान–पिपरी नगरपरिषदेत तब्बल सहा वर्षांनंतर सहा विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड पार पडली असून, या निवडीमुळे नगरपरिषदेत राजकीय स्थैर्य निर्माण झाल्याचे चित्र आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक ठोंबरे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया शांततेत पार पडली.

कान्हान–पिपरी नगरपरिषद स्थापन होऊन आता १२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सन २०१४ मध्ये भाजपच्या आशा पनिकर वशंकर दांडे यांनी नगराध्यक्षपद भूषवले होते, तर २०२० मध्ये शिवसेनेच्या करुणा आहंकार यांची निवड झाली होती. मात्र, विविध राजकीय व तांत्रिक कारणांमुळे मागील काही वर्षांत विषय समिती सभापतींच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या.

अखेर २०२६ मधील निवडणूक प्रक्रियेत भाजपने एकत्रित ताकद दाखवत २० पैकी १४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. त्यानंतर विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली आणि कोणताही विरोध नसल्याने सर्व सहा सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडणुकीत

  • सार्वजनिक बांधकाम समिती – केतन भिवगडे
  • आरोग्य व स्वच्छता समिती – रिक्षा चव्हरे
  • पाणीपुरवठा समिती – आशा महाते
  • महिला व बालकल्याण समिती – योगिता भालावी
  • नियोजन व विकास समिती – प्रशांत पाटील
    यांची सभापती म्हणून निवड झाली. तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी प्रियंका ठाकरे यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी नगरपरिषद सदस्य, अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने निवड झालेल्या सभापतींनी शहर विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

सहा वर्षांनंतर बिनविरोध निवड झाल्याने कान्हान–पिपरी नगरपरिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Pages