भंडारा | प्रतिनिधी :
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोसरा येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मातीचे दुमजली घर पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि घरातील इतर साहित्य जळून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोसरा येथील पुष्पराज आबाजी हटवार यांच्या मातीच्या दुमजली घराला गुरुवारी (सायंकाळी सुमारे ७.३० वाजता) अचानक आग लागली. घर लाकूड आणि फाट्यांचे असल्यामुळे काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पवनी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या आगीत चार लाख रुपयांच्या नोटांची बंडले, सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने तसेच घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोसरा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या आगीत रोख रक्कम, दागिने आणि घरातील साहित्य मिळून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले.
पुष्पराज आबाजी हटवार यांच्या मातीच्या दुमजली घराला गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. घर लाकूड-फाट्यांचे असल्याने काही वेळातच आगीने संपूर्ण घर कवेत घेतले. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तर पवनी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. मात्र आगीत चार लाख रुपयांच्या नोटांची बंडले, चार तोळे सोन्याचे दागिने आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. पोलिस व महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे.

