लाखनी पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; ६९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
3 Views
2 Min Read
भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलिसांची जलद कारवाई; घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत, चोरीचे दागिने व मुद्देमाल हस्तगत.

लाखनी (भंडारा) : लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीस अटक केली असून चोरीस गेलेला सुमारे ₹६९,०६२ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास फिर्यादी विक्रांत गोपीचंद निर्वाण (वय ३६ वर्षे, रा. बोरगाव, ता. लाखनी, जि. भंडारा) हे आपल्या पत्नी व दोन मुलांना सासरवाडी मोजा मिरेगाव येथे सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर रात्री सासरवाडीत मुक्काम करून दि. ०४ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी परतले असता, त्यांच्या घरातील बेडरूममधील लोखंडी आलमारी उघडी दिसून आली. घरातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले असल्याने त्यांनी तपासणी केली असता आलमारीतील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये १ सोन्याची अंगठी (वजन ५ ग्रॅम, किंमत ₹६३,८१२), ५ चांदीच्या अंगठ्या (वजन ४० ग्रॅम, किंमत ₹२,८००), १ चांदीचे कर्डोळे (वजन २५ ग्रॅम, किंमत ₹१,७५०) तसेच ५ चांदीचे कडे (वजन ९० ग्रॅम, किंमत ₹७००) असा एकूण ₹६९,०६२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळून आले.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध लाखनी पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. २२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त माहितीदार सक्रिय करून परिसरातील संशयित तरुणांची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान आरोपी चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी भंडारा येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून भंडारा बसस्थानक परिसरातून आरोपी श्रेयस जगदीश निर्वाण (वय २२ वर्षे, रा. बोऱगाव) यास ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विशेष म्हणजे, लाखनी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक करून चोरीचा संपूर्ण माल जप्त केला, त्यामुळे पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली श्री. शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलीस हवालदार वच्छला वायले तसेच पोलीस शिपाई ओमप्रकाश साबे व शुभम फंडे यांनी पार पाडली.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Pages