कबड्डी स्पर्धेत गैरव्यवहार उघड: प्रमाणपत्र विक्रीचा धंदा, खेळाडूंवर अन्याय..

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
2 Min Read
कबड्डी स्पर्धेत झालेल्या प्रमाणपत्र गैरव्यवहाराबाबत भंडाऱ्यात घेतलेली पत्रकार परिषद

भंडारा | प्रतिनिधी

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये मोठ्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून न खेळणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्रे देणे, तर प्रत्यक्ष खेळलेल्या खेळाडूंना डावलणे तसेच लाखो रुपयांत बनावट प्रमाणपत्रांची विक्री झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे विदर्भातील कबड्डी विश्वात खळबळ उडाली आहे.

माजी आमदार तथा नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश व्यास यांनी भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. विदर्भ अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन आणि भंडारा जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तुमसर (जि. भंडारा) येथे झालेल्या ७३ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला.

पैसे घेऊन निवड, बनावट प्रमाणपत्रांचा धंदा

स्पर्धेतील निवड प्रक्रियेत काही खेळाडांकडून पैसे घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचा तसेच बोगस प्रमाणपत्रे देऊन खेळाडूंना पुढील स्पर्धांमध्ये खेळवण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी प्रत्यक्ष खेळ न करणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्रे देण्यात आली, तर खरे खेळाडू प्रमाणपत्रांपासून वंचित राहिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धेतील प्रकार

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह येथे झालेल्या ७२ व्या सीनियर कबड्डी स्पर्धेत (१३ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५) तीन खेळाडूंना प्रमाणपत्रे देण्यात आली नाहीत, तर इतर जिल्ह्यातील खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे अनेक खेळाडूंच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष?

या संपूर्ण प्रकाराबाबत तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोपही व्यास यांनी केला. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी किंवा शैक्षणिक प्रवेश मिळाला असल्यास ते रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चौकशीची मागणी

या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कबड्डी खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी केली आहे. खेळाडूंच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *