Whats’Up‘बाबा’ने महिलेला गंडवले; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल…

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
2 Min Read
WhatsApp ‘बाबा’ने महिलेला गंडवले; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

भंडारा | प्रतिनिधी

“तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत… नातेसंबंध बिघडले आहेत… पूजा-पाठ केला तर सगळं ठीक होईल…” अशा शब्दांच्या जाळ्यात अडकवत एका अज्ञात इसमाने महिलेकडून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशन, भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबर २०२५ दरम्यान व्हॉट्सअॅप क्रमांकावरून स्वतःचे नाव वसीम अली खान (बाबा) असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी व नातेसंबंधातील तणाव दूर करण्यासाठी पूजा-पाठ व धार्मिक विधी करण्याचे आमिष दाखवण्यात आले. विश्वास संपादन करत टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले.

फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, संबंधित ‘बाबा’ने विश्वास संपादन करून एकूण ४ लाख ३५ हजार २०० रुपये विविध खात्यांमध्ये जमा करून घेतले. मात्र पूजा पूर्ण झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पोलिस स्टेशन, भंडारा येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ब) व ६६(क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णकुमार तिवारी करीत असून, संबंधित मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि डिजिटल व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर ओळख नसलेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. पूजा-पाठ, तंत्र-मंत्र, नातेसंबंध सुधारणा अशा आमिषांना बळी पडू नये. कोणत्याही कारणासाठी ऑनलाईन पैसे पाठवण्यापूर्वी खातरजमा करावी. क्षणिक विश्वास आणि भावनिक कमकुवतपणाचा गैरफायदा घेऊन मोठ्या आर्थिक फसवणुका केल्या जात असल्याचे हे प्रकरण ठळक उदाहरण असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *